कसबा बावडामध्ये ६० लाखाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ

 

कोल्हापूर:आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील कसबा बावडा येथील विकास कामांसाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील व स्थानिक नागरिक यांच्या हस्ते झाला.महापालिका शुगरमिल प्रभाग क्रमांक एक मधील आष्टविनायक कॉलनी, प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर, शाहू मिल चाौक ते आनंदा पंदारे घर येथील रस्ता आणि गटर्स या कामाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सुभाष बुचडे, संदीप नेजदार, मोहन सालपे, गजानन बेडेकर, युवराज उलपे, शामराव लाड, शिवाजी जाधव, प्रदीप उलपे, राजू घराळे, अजित पाटील, मनोहर गवळी, पंडीत घराळ, वैशाली पाटील, प्रकाश कामते आदी उपस्थित होते.प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू रेडेकर मळा येथील गटर्सच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी धीरज पाटील, शामराव करपे, वैभव गाताडे, मोहन पाटील, सुनिल पाटील निवृत्ती पाटील उपस्थित होते.प्रभाग क्रमांक तीन बलभिम गल्ली येथील शाहू तरुण मंडळ ते आनंदा पंदारे घर येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सुरेश कोटकर, सुनिल सुतार, युवराज सुतार, सचिन कांबळे उपस्थित होते.प्रभाग क्रमांक पाच लक्ष्मी विलास पॅलेस येथील बिरंजे गल्ली रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ वेळी मधुकर बिरंजे, शरद पाटील, अशोक बिरंजे, प्रदीप थोरवत, साई चव्हाण, प्रा. लक्ष्मण खरपे, सिकंदर मकानदार उपस्थित होते.पोलिस लाईन प्रभाग क्रमांक सहा मधील पोलिस लाईन काॉलनी ते अष्टेकर नगर आरसीसी गटरच्या कामाच्या शुभारंभ वेळी स्वाती यवलुजे, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब चव्हाण, सदाशिव पाटील, अक्षय चाौगुले, श्रीकांत चव्हाण, शिवाजी भोसले, दिलीप नाटेकर पप्पू पाटील उपस्थितीत होते.नगरसेवक माधुरी लाड यांच्या प्रभाग क्रमांक चार लाईन बाजार या ठिकाणी महानगरपालिकेच्या एच्छिक फंडातून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरुंगुळा केंद्राचं उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी आनंदराव पवार , विलास घाटगे , गजानन महामुळकर विलास कदम , शोभा महामुळकर, अरुण साळसकर, आनंदराव साळसकर, लक्ष्मण देसाई, स्थानिक नागरिक महिला , ज्येष्ठ नागरिक उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!