संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.करखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे होते.भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी देणे ही शेतकऱ्यावर मेहरबानी नव्हे तर आमचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे, कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडी प्रकल्पही पूर्ण होईल. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातच हक्काचा ऊस पिकेल. त्यामुळे, येत्या एक-दोन वर्षातच गाळप क्षमता दहा लाख टन, पन्नास मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तार वाढ करणारच. हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट अशी उद्दिष्टे असल्याचेही ते म्हणाले.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सात वर्षापूर्वी हा कारखाना बाल हनुमान असतानाही प्रस्थापित साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर आणि शेतकऱ्यांना सोयीसुविधा दिल्या आहेत. आज हा बाल हनुमान सात वर्षांचा झाला आहे. साखर कारखानदारी समोरील आव्हानांचा द्रोणागिरी पर्वत उचलायची ताकद आणि क्षमता या हनुमानात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात महागाई गगनाला भिडली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!