विनोद कांबळी चिडला, ‘या’ खेळाडूला म्हणाला, ‘जाके खेल दांडिया’ व्हीडिओतून मांडल्या भावना

 

मुंबई : काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडच निराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही.
विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. यात अतिशय भावनिक होऊन बोलताना ते म्हणतात, “कालच्या पराभवानंतर मी अतिशय दु:खी आहे. काल भारताला पाकिस्तानने अतिशय सहजपणे हरवले. एकदम ‘ओम फट्ट स्वाहा’ अशी भारताची अवस्था झाली. माझ्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले आहेत. काल काय झाले? नेमकी चूक कुठे झाली? यात मुख्य गुन्हेगार कोण आहे? आपण एक विकेट घेऊ शकलो नाही, ना एक बॉल परतवू शकलो. काय आहे हे सगळं?’ 

हार्दिक पांड्या याच्यावर तर कांबळीने विशेष राग व्यक्त केला. तो म्हणाला, हार्दिक तू दुखापत झालेली असतानाही खेळतो आहेस. मी तुला इतकेच सांगेन, फिटनेस मिळव. हार्दिक पांड्या, जाके खेल दांडिया!’ 

‘कू’ व्हीडिओची लिंक

<iframe src=”https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=940f802d-78e6-4510-a63e-4d33e28fc139″ class=”kooFrame”></iframe><script src=”https://embed.kooapp.com/iframe2.js”></script>

सोबतच कांबळीने अजून एक ‘कू’ करत म्हटले आहे, की आधी मोहम्मद आमीर, ट्रेंट बोल्ट आणि आता शाहीद शाह आफ्रिदी. भारत या डाव्या हाताने खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध एखादी रणनीती का ठरवत नाही?’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!