
प्रो कबड्डी लीग टीम्सपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे यू मुंबा. असंख्य चाहते मिळवलेली ही दमदार टीम नुकतीच ‘कू’वर दाखल झाली आहे.कू हा भारतातला वेगाने लोकप्रिय होणारा बहुभाषिक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे यू-मुंबाला आपल्या चाहत्यांसोबत खास मातृभाषेत संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे.आपल्या अधिकृत हॅंडलवरून कू करताना टीम यु-मुंबा अतिशय उत्साहात खेळाडूंचे पडद्यामाचे एक्सक्लुजिव्ह व्हीडिओज आणि फोटो शेअर करते आहे. सध्या सगळेच खेळाडू आठव्या सीझनमध्ये प्रभावी कामगिरी करता यावी यासाठीचा सराव करण्यात गुंतले आहेत. बंगळुरूमध्ये २०२१ च्या डिसेंबरमध्ये हा आठवा सीझन रंगणार आहे.कू वरचे बहुभाषिक फीचर्स वापरून यू मुंबाने खास मराठी, हिंदी आणि इंग्रजीत कू केले आहे. त्यांनी दोन व्हीडिओजही शेअर केले आहेत. एका व्हीडिओमध्ये डिफेंडर सुनील सिद्धगवळी फॅन्सना ‘कू’वर येत टीमला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करतो आहे. “डिफेंडर सुनील सिद्धगवळी तुम्हा सगळ्यांना @U_Mumbaच्या ऑफिशियल हॅंडलला फॉलो करण्याचे निमंत्रण देतोय. तमिळमधला चमकता तारा अजिथ कुमार यानेही याबाबत ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे तेलगू टायटन्स ही प्रो कबद्दी लीगची अजून एक टीमही नुकतीच ‘कू’वर दाखल झाली आहे.
Leave a Reply