प्रो कबड्डी लीग टीम पुणेरी पलटन आता ‘कू’वर!

 

पुणे: पुणेरी पलटन म्हणजे प्रो कबड्डी लीग टीम्सपैकी एक लोकप्रिय आणि ताकदीची टीम. पुणेरी पलटन आता नुकतीच दाखल झाली आहे ‘कू’ वर! आता आपल्या आवडत्या टीमशी चाहत्यांना मातृभाषेत संवाद साधता येईल. अल्पावधीतच टीमचे या मंचावर १ हजाराहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

@puneripaltan या आपल्या अधिकृत हॅंडलवरून कू करत टीम सध्या भरभरून व्हीडिओज आणि पडद्यामागच्या खास स्टोरीज पोस्ट करते आहे. तुमचे आवडते खेळाडू लीगच्या आठव्या सीझनसाठी कसून सराव करताना तुम्हाला दिसतील. हा आठवा सीझन यंदाच्या डिसेंबरमध्ये बॅंगलोरला पार पडणार आहे. 

काय आहे Koo(कू मराठी) :

Koo कू ची स्थापना मार्च २०२० मध्ये झाली. कू हा एक भारतीय भाषांमधला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. कू विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून विविध क्षेत्रांत कार्यरत भारतीय स्वतःला त्यांच्या मातृभाषेत इथं व्यक्त करू शकतात. ज्या देशात फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जो भारतीय युजर्सना मातृभाषेचा अस्स्ल अनुभव देऊ शकेल. कू हेच काम प्रभावीपणे करत आहे. भारतीय भाषांना प्राधान्य देणाऱ्या देशाच्या नागरिकांना ‘कू’ने एक हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!