
कोल्हापूर: शिवाजी पुल ते गंगावेश दरम्यान रस्त्याचे कामकाज गेली चार वर्ष सुरू आंदोलनाच्या रेट्यामुळे रस्त्याचे काम सुरू आहे* या मार्गावर शिवाजी पूल येथून येऊन गायकवाड पुतळ्याजवळ बॅरिकेट असलेने जवळच्या अरुंद भोई गल्ली अथवा पंचगंगा नदी घाट पानंद रस्ता हे शंकराचार्य मठ मार्गे जात आहे रस्ता अरुंद असल्याने लोकांना अक्षरशः घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे गंगावेश येथून अवजड वाहने व चार चाकी वाहने बॅरीकेट मधून पंचगंगा हॉस्पिटल कडे येथे वाट नसल्याने जवळच्या अरुंद बोळातून जात आहे रात्री शववाहीका ऊस वाहतूक ट्रॅक्टर या मार्गावर येऊन अडकले होते तरी गंगावेश व शिवाजी पूल येथे रस्ता बंदचे बोर्ड लावावेत ट्रॅफिक पोलीस दोन्ही ठिकाणी ठेवावेत व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी अशी मागणी निवेदनाद्वारे कृती समितीच्या वतीने किशोर घाटगे, आर एन जाधव, रियाज बागवान, सनी अतिग्रे, यांनी केली यावेळी वाहतूक निरीक्षक सौ स्नेहा गिरी यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून मार्गात अडथळा येणारे डिजिटल बोर्ड व इतर अतिक्रमणा विरुद्ध हा कारवाई सुरू केली असून कृती समितीच्या मागणीनुसार वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी कृती समितीने मार्गदर्शक डिजिटल बोर्ड लावण्याचे आश्वासन दिले यावेळी जनतेने सतत सहकार्य केले आहे रस्ता पूर्ण होईपर्यंत करावे असे अवाहान कृती समितीने दिले असून शिष्टमंडळात महेश कामत किशोर माने सुरज धनवडे अनंत पाटील आदींचा समावेश होता
Leave a Reply