
बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावरचा वावरही प्रभावी असतो.आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी श्रद्धा आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही पोशाखांमध्ये ती तेवढीच क्युट दिसते. आताही तिने एक खास व्हीडिओ ‘कू’वर पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.श्रद्धा कायमच फिटनेस फ्रिक राहिली आहे. आत्ता पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये श्रद्धा मेहनतीने अवघड वर्कआऊट करताना दिसते आहे. व्यायामाचे अतिशय आव्हानात्मक प्रकार ती लीलया करते आहे. या व्हीडिओला तिने #TuesdayWorkout #Workout #sweatitout #kookiyakya असे हॅशटॅग्जही दिले आहेत.
Leave a Reply