रविना टंडन दिसणार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

 

 ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनची जादू अजूनही कायम आहे. कु या सोशल मिडीयावर सतत आपले फोटो आणि व्हीडिओही शेअर करत असते.आता रवीना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमातून डेब्यू करते आहे. ‘अरण्यक’ ही सिरीज चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण करते आहे. नुकताच ‘अरण्यक’चा ट्रेलर आला आहे.
कु या सोशल मिडीयावर तो ट्रेलर पाहता येईल. ‘मस्त मस्त गर्ल’ आता नव्याकोऱ्या दिसणार आहे. ही सिरीज एक मिस्ट्री-थ्रिलर असणार आहे. या सिरीजमध्ये रवीना एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कस्तुरी डोगरा एसएचओ हे तिच्या भूमिकेचं नाव आहे. ही पोलिस अधिकारी विविध आव्हानात्मक रहस्यं उलगडते. या सिरीजमध्ये रोमांच, रहस्य आणि थ्रील अनुभवायला मिळेल.
अरण्यक सिरीज जंगलात शूट केलेली आहे. एका बापाचा आपल्या मुलाशी संवाद सुरू असतो. पडद्यावरची दृश्यंही खूपच रंजक आणि गुंतवून ठेवणारी आहेत. एक व्यक्ती चंद्रग्रहणाच्या रात्री परत येतो आणि येताना सोबत लोकांचा मृत्यूही घेऊन येतो. 10 डिसेंबरला ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.
या सिरीजमध्ये रवीनासोबतच आशुतोष राणा आणि परमब्रता चॅटर्जी हे मुख्य भूमिकेतसुद्धा दिसतील. नेटफ्लिक्सही सध्या मोठमोठ्या शहरांच्या कथा सांगण्याऐवजी लहान-लहान गावं, खेडी यांच्यावर लक्ष केंद्रित करते आहे. ही वेब सिरीजही तशीच आहे. 47 वर्षांची रविना टंडन अनोख्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विनय वायकुल यांनी दिग्दर्शित केल्या. सिरोनाच्या पहाडी भागात ही कथा घडते.
Link for online Media
https://www.kooapp.com/koo/tandonraveena/10bf5845-2ecc-4f9e-b55d-eef29153e93e

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!