
कोल्हापूर:आज सकाळी १० वाजता अंबाबाई मंदिर येथे देवस्थान समितीचे वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या शुभहस्ते तसेच सचिव शिवराज नाईकवडे, लेखापाल धैर्यशील तिवले व व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी पुजारी व देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.यामध्ये देवस्थान समिती अधिनस्त मंदिर येथील अलंकार पूजा यांचे फोटो उदा.सिद्धिविनायक मंदिर,जोतिबा मंदिर,टेम्बलाई मंदिर,दत्त भिक्षालिंग,किरणोत्सव सोहळा,नवरात्र सोहळा असे फोटो दर्शवण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही ही दिनदर्शिका महत्त्वाची ठरेल. ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र ५० रुपये इतके मूल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Leave a Reply