
मुंबई: भारत वैविध्यपूर्ण भाषा बोलणाऱ्यांचा एकसंध देश आहे. विविध संस्कृती आणि विचारांचा उत्सव करतानाच गाभ्यात भारतीय म्हणून असलेली ओळख आपण कायम जपतो. अशावेळी हव्या त्या भाषेत ऑनलाइन अभिव्यक्तीचा अवकाश खुला करणारा मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ने पहिल्यांदाच ‘भारतीय आवाज’ समजून घेत एक अहवाल प्रकाशित केला आहे. वैविध्यपूर्ण आयुष्य जगणारे भारतीय कसा विचार करतात, कसे व्यक्त होतात त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे. प्रादेशिक स्तरावर झळकणाऱ्या लोकप्रिय व्यक्तिमत्वांबाबत भारतीयांना काय वाटतं हेही यातून समोर येते. यातून अजून एक मोलाची बाब ठळक होते, ती म्हणजे, भारत सांस्कृतिकदृष्ट्या इतका वैविध्यपूर्ण असतानाही त्यांची मातृभाषेत व्यक्त होण्याची गरज मात्र एकसारखीच आहे.
2021 मध्ये मराठी माणूस ‘कू’वर आपल्या मातृभाषेत भरभरून व्यक्त झाला. आपल्या जिव्हाळ्याच्या प्रादेशिक विषयांवर सडेतोड मतं मांडत मराठी समुदायानं परस्परांशी संवाद साधला.
मराठी लोकांनी कू वर काय पोस्ट केलं आणि त्यांना काय भावलं हे जाणण्याचा हा प्रयत्न
सर्वाधिक लाइक केलेला कू:
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहताना केलेले ‘कू’
सर्वाधिक उल्लेख केला गेलेले सेलिब्रिटी – अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांचे कर्करोगाचे निदान आणि त्यावर यशस्वी मात याने समुदायाला प्रेरणा मिळाली.
ट्रेंडिंग हॅशटॅग्ज –
‘कू’ च्या मंचावर म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस मराठी युजर्समध्ये कोविड- 19 च्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ट्रेंड झाले. सोबतच लहान मुलांमधील कोविड-१९ हा विषयही खूप चर्चिला गेला. हा आजार पसरू नये यासाठी समुदायातील लोकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय आणि सल्ले या मंचावर शेअर केले. 1 मे रोजी मराठी लोकांनी महाराष्ट्र दिनसुद्धा उत्साहात साजरा केला. मराठा सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनीही मराठी लोकांनी भरभरून पोस्ट केल्या.
‘कू’ भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी एक सशक्त मंच मिळवून देते. कू सध्या 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे – हिंदी, मराठी, कन्नडा, तेलुगू, बंगाली, तमिळ, आसामी, गुजराती, पंजाबी आणि इंग्रजी. कू ने नुकताच २ कोटी डाऊनलोड्सचा टप्पा ओलांडला असून येत्या वर्षात १० कोटीच्या घरात पोचण्याकडे ‘कू’ वेगाने वाटचाल करते आहे.
काय आहे कू?
‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, ‘कू’ विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो.
Leave a Reply