
कोल्हापूर: शिवसेनेला तिसरी जागा देण्याची तयारी होती. काही नेत्यांना ते पटले होते. परंतु राक्षसी प्रवृत्तीमुळे निवडणूक ही सभासदांवर लागली गेलेली आहे. जिल्हा बँकेत आमचे सगळे पॅनेल निवडून येणार आहे. सत्तारूढ आघाडीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पुरस्कृत सर्व जागांवर आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोणाला बहुमताने निवडून द्यायचे हे सुज्ञ सभासद ठरवतील असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. एका जागेसाठी निवडणूकची गरज नव्हती. विरोधकांनी कशासाठी पॅनल केले आहे हेच कळत नाही. असे आमदार पी. एन.पाटील यांनी सांगितले. यावेळी मधुकर जांभळे राजू लाटकर बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
Leave a Reply