
कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०२२ मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या तब्बल ४२१ विद्यार्थ्यांना प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळाल्याबद्दल या सर्वाना शुभेच्छा देण्यासाठी कौतुक सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले होते.डी.वाय.पाटील ग्रुपची पहिली संस्था असलेल्या या महाविद्यालयाला ३७ वर्षांची गुणवत्तापूर्ण परंपरा लाभली असून पुढील काळात महाविद्यालयाचे नाव आणखी उंचीवर पोहोचवण्यासाठी व सर्वच विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेन्टच्या माध्यमातून चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार २०२२ ला पास आउट होणाऱ्या ४२१ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर मिळाल्या असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अतिशय आनंददायी आहे.यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्याची प्लेसमेंट व्हावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, त्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
Leave a Reply