“कू’वरील अनुपम खेर यांचा ओमायक्राॅन व्हिडीओ तुफान व्हायरल

 

सध्या सर्वत्र ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटची चर्चा आहे. देशभरासह राज्यात ओमायक्राॅनशिवाय दुसरा विषय नाही. ओमायक्राॅन इतका घातक नसला आणि त्यामुळे मृत्यू होत नसला तरी त्याच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच ओमायक्राॅन बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे.
ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांनी नेमके यावरच बोट ठेवणारा एक तिरकस व्हिडीओ व्टिटरचा भारतीय अवतार असलेल्या “कू’ या अॅपवर प्रसारित केला आहे. प्रसारित होताच अक्षरश: लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि तेवढ्याच वेगाने तो व्हायरलही करीत आहेत. ओमायक्राॅन फुफ्फुसावर आक्रमण करीत नाही. तर घशाला बाधित करतो. अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडीओतून ही बाब तिरकसपणे सांगितली आहे. यासाठी त्यांनी “कही ये वो तो नही’ या गाण्याची पॅरोडी केली आहे –
जरासी खरखराहट होती है
तो दिल सोचता है
कही ये वो तो नही, कही ये वो तो नही
Check this post from @anupampkher on Koo App:
“Even after two vaccinations!! 😳 #MaskUp #SafeDistance #Mask…”
https://www.kooapp.com/koo/anupampkher/199956a6-1359-4af0-b51c-c954255e8d93
Download Koo App
https://www.kooapp.com/dnld
या ओळीतून साधे खाकरले तरी घाबरल्यासारखे होते अशी मजेदार भावना व्यक्त केली आहे. “कू’ वरील हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला. आज प्रत्येकाच्या तोंडी हाच व्हिडीओ आहे. या शिवाय दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे पाहाता दोन डोस घेतल्यानंतरही निष्काळजीपणा न करता मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन “कू’ अॅपवर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!