पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला “क्रेडाई”चे प्रफुल्ल तावरे यांचा पाठींबा

 

कोल्हापूर: कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे सचिव आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विनंतीला मान देऊन पुणे शिक्षक मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. प्रफुल्ल तावरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या शिक्षकांप्रती असणाऱ्या भुमिकेला बळ मिळाले असून शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी गोकुळप्रमाणेच महाविकास आघाडीला भरभरून मतदान करावे आणि विजयी करावे असे आवाहन केले.यावेळी अरविंद तावरे, राजेंद्र शिंगटे, गणपत तावरे यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

बुधवार, 21 ऑक्टोबर, 2026 स्थळ- कोल्हापूर

Comments are closed.

error: Content is protected !!