अभिनेते अनुपम खेर यांनी मोलाचा संदेश देत कू वर शेअर केली पोस्ट

 

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. स्वतःच्या अनोख्या भूमिकांसह वैयक्तिक आयुष्यातील गमतीदार गोष्टीही खेर आवर्जून चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या प्रबोधनपर पोस्ट्सही लोकांना आवडतात. अशीच एक पोस्ट त्यांनी कू वर  शेअर केली आहे. यात कोरोना काळात त्यांनी घेतलेली लस, ते नियमित घेत असलेली काळजी याबाबत ते बोलत आहेत.दोन मिनिटांचा हा व्हिडियो मोलाचा संदेश देतो. खेर म्हणतात, ‘मला नाही माहीत कोरोनाच्या लसीमध्ये नेमकं काय वापरलं गेलंय. पण माझा विज्ञानावर विश्वास आहे. तुम्हीही तो ठेवला पाहिजे. मला कोरोनाने मरायचं नाही. कुठल्याशा हॉस्पिटल बेडवर क्रूर मृत्यूने मला गाठावं, प्रिय लोकांना मी शेवटचं भेटूही शकणार नाही… मला नको आहे हे. म्हणून मी लस घेतली. मी मास्कही नियमित वापरतो. तुम्हीही तो वापरा.’
 
Check this post from @anupampkher on Koo App:
“I’m vaccinated for ME & I wear a mask for YOU!!!
No, I don’…”
https://www.kooapp.com/koo/anupampkher/54c76381-6201-46d4-a473-3934349a0fd4
Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!