
कोल्हापूरः. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९ त्यांचे संगोपन, व्यवस्थापन पाहणेसाठी संचालक मंडळाने भेट दिली.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि आपल्या जिल्ह्यातील हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हैशी दूध देत नाहीत, गाभण राहत नाहीत, त्यांचा भाकडकाळ जास्त आहे असे बरेच गैरसमज आहेत. या उलट बेरकळवाडी सारख्या दुर्गम गावातील दूध उत्पादकांनी संघाचे पशुसंवर्धन, वैरणविकास, पशुखाद्य व संकलन विभागाच्या मदतीने या सर्व बाबीवर मात करून हरियाणा येथून खरेदी केलेल्या मुऱ्हा म्हैशी आपल्या जिल्ह्यात सुद्धा यशस्वी होतात व म्हैशीचा दूध व्यवसाय हा किफायतशीर आहे हे बेरकळवाडी च्या दूध उत्पादकांनी दाखवून दिलेले आहे. सध्या ७०० लिटर दूध संकलन असून भविष्यात ते १४०० लिटर पर्यंत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे त्यासाठी लागणरी सर्व मदत संघ करण्यासाठी तयार आहे असे मनोगत श्री. पाटील यांनी केले व पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले कि खास करून हिरव्या वैरणीची उपलब्धता, आहारामध्ये सुक्या चाऱ्याचा अंतर्भाव, मिनरल मिक्श्चर व्यवस्थित वापर, महालक्ष्मी पशुखाद्य व टी.एम.आर चा वापर व गोठ्यातील योग्य व्यवस्थापन याचा वापर करून म्हीशीचे उच्चांकी दूध उत्पादन तर घेतलय पण सर्वांच्या म्हैशी व्याल्यानंतर ३ ते ४ महिन्यात गाभण गेल्या आहेत. या सर्व उत्पादकांनी वेतातील सरासरी दूध २००० ते २२०० लिटर इतके घेतले आहे. याचबरोबर सर्वांच्या गोठयात जातिवंत रेडया तयार झालेल्या आहेत. बेरकळवाडी सारख्या दुर्गम भागातील दूधउत्पादकांनी हे यश संपादन केले असून जिल्ह्यातील इतर दूध उत्पादकांनी मार्गदर्शन ठरणार असून म्हैशीचा दूध व्यवसाय गायीपेक्षा किंबहुना जास्त उत्पादन देणारा असून जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी म्हैस व्यवसायाकडे वळावे.
याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक कुंडलिक बेरकळ सहयाद्री दूध संस्थेचे चेअरमन म्हणाले कि हरियाणा म्हैशी खरेदीमुळेच आमच्या गावाची नवीन ओळख झाली आहे. गावातील दूध व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने चालू होता. आता गोकुळ मुळेच या व्यवसायाला चालणा मिळाली असून गावातील लोकाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. भविष्यात दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहू असे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे चेअरमन विश्वास पाटील होते यावेळी मनोगत जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाळासो खाडे, अजित नरके,आभार पोपट बेरकळ यांनी मानले, सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले.यावेळी चेअरमन.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, संघाचे संकलन व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी,तसेच दूध संस्थेचे पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply