भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चाच्यावतीने नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

 

कोल्हापूर: महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून त्या पदाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील,  महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे-मारो आंदोलन करण्यात आले.           युवा मोर्चाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तर महिला मोर्चाच्यावतीने बिंदू चौक येथे स्वतंत्र कार्यक्रम घेत तीव्र निषेध नोंदवला.  “नाना पटोले कोण रे त्याला जोडे मारा दोन रे”, “नाना पटोलेच करायचं काय खाली डोक वर पाय”, “निम का पत्ता कडवा है, नाना पटोले भडवा है” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

“महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकावर राहिली व राष्ट्रीय कोंग्रेस पार्टी चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने वैफल्य ग्रस्त झालेले कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष स्वतःचे अपयश लपवण्याच्या हेतूने रविवारी पुन्हा एकदा देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्यावर बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपाहार्य विधान करून खोटी प्रसिद्धी मिळविण्याचा व पार्टी हाय कमांडचा विश्वास मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला.  कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जर नाना पटोले कोल्हापुरात येण्याचे धाडस करतील तेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडून त्यांचे कोल्हापुरी चप्पलानेच स्वागत करण्यात येईल. तसेच जोपर्यंत नाना पटोले यांना पोलिस प्रशासन अटक करत नाही व कोंग्रेस पार्टी चे हाय कमांड त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत नाहीत तो पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे उग्र आंदोलने चालूच राहतील” असा इशारा जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!