
वंदूर: संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने केलेला अन्याय तर मी दूर करणार आहेच. तसेच, ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. असा सूर आळवीत कागल तालुक्याच्या विकासासाठी आपला दोस्ताना यापुढेही असाच चालू राहील. असा निर्वाळा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.वंदूर ता,कागल येथे जाहीर कार्यक्रमात मंत्री श्री मुसली बोलत होते. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजानेसह साडेसहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा उदघाटन व सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री. घाटगे यांच्या अन्नपुर्णा कारखान्याला अडचणीच्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली. त्यांचे कार्यकर्ते हे आता आमचेच आहेत. त्यांना अंतर देणार नाही. आम्ही दोघेही मोठ्या मनाचे आहोत. कोणी काहीही सांगितले तरी आमच्यामध्ये अंतर येऊ देणार नाही.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांना माझी एकच विनंती आहे. मला वैयक्तिक कोणतेही पद देऊ नका. पण आपल्याला ज्यांनी साथ दिली आहे त्या आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्या. त्यांची कामे करा. आपल्या मदतीमुळे उभारलेला अन्नपुर्णा साखर कारखाना तुम्हाला अभिमान वाटेल इतका चांगला चालवू. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ ज्या उमेदीने समाजजीवनात कार्यरत होते, त्याच उमेदीने किंबहुना; त्याहून अधिक गतीने ते आजही कार्यरत आहेत. जनतेने दिलेली जनसेवेची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडीत आहेत.
Leave a Reply