महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा भाजपच्यावतीने निषेध

 

कोल्हापूर : राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या नशेबाज निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा याठिकाणी “उद्धवा अजब तुझे सरकार” “ठाकरे सरकार हाय हाय” “तिघाडी सरकारच करायचं काय खाली डोक वर पाय” “सुरु आहेत छुपे बार आता दारू हि मिळेल दारोदार” अशा घोषणा देत सरकार प्रति आपल्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.आंदोलनाच्या माध्यमातून टेबलवर मद्याच्या बाटल्या ठेवून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, भारतीय जनता पार्टी या नशेबाज निर्णयाला तीव्र विरोध करत आहे. मविआ म्हणजे महाविकास आघाडी कि मद्य विक्री आघाडी आहे हे या सरकारला कळेनासे झाले आहे. खुलेआम सहजसोपी मद्य विक्री करण्याचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला नशेत ठेवण्याचा निर्णय म्हणावा लागेल. मॅाल्स, किराणा दुकानामध्ये मद्य विक्री होण्यामुळे राज्यातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन अखंड पिढी बरबाद होण्याचा धोका निर्माण होणार आहे. महाविकास आघाडीचा हा जो काही निर्णय आहे तो जनतेला बरबाद व व्यसनाधीन करणारा निर्णय आहे. या नशेबाज सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आज हि निदर्शने करत आहोत जर का सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर भाजपा याही पेक्षा तीव्र आंदोलन करेल असा ईशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केला. 

यावेळी बोलताना सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, गेल्या दोन वर्षामध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या तसेच एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या याप्रश्नामध्ये सरकार न बोलता नको त्या विषयामध्ये हे सरकार निर्णय घेत आहे. या सरकारला जनतेचे काही पडलेले नाही असे ठाम पणे दिसून येत आहे. हे सरकार महाभकास आघाडी सरकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हा निर्णय घेऊन या सरकारने जनतेवर अन्याय करण्याचे काम करत आहे. असे निर्णय घेऊन लोकांचे सुखी चालू असलेले संसार उध्वस्त करण्याचे कटकारस्थान हे सरकार करत आहे.
तसेच सरचिटणीस गणेश देसाई, हेमंत आराध्ये यांनी आपल्या भाषणात सरकारचा निषेध करून हा मद्य विक्रीचा निर्णय त्वरित रद्द करावा असे नमूद केले.
यानंतर भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मा. शंकरराव जाधव यांना निवेदन सादर करून नशेबाज मद्य विक्रीचा निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, अजित सूर्यवंशी, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, मामा कोलवणकर, शशिकांत रणवरे, अतुल चव्हाण, मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, अभिजित शिंदे महेश यादव, विशाल शिराळकर, प्रसाद नरुले, विनायक पोळ, अनिकेत मुतगी, मनोज इंगळे, प्रसाद पोटोळे, सुनीलसिंह चव्हाण, धीरज पाटील, गिरीश साळोखे, नरेंद्र पाटील, सुनील पाटील, राजाराम परीठ, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, लता बर्गे, मंगला निपाणीकर, सुजाता पाटील ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!