
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी पाहिले ; मात्र दुर्देवाने त्यांचे अकाली निधन झाले. आमदार जाधव यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांचे हात बळकट करूया असे आवाहन माजी नगरसेवक व राष्ट्रवादी प्रदेश संघटक राजेश लाटकर यांनी केले.शिवाजी पार्क येथील किंग्ज कोर्ट अपार्टमेंट जवळील रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जयश्री जाधव यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.राजेश लाटकर म्हणाले, आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी संवाद साधत, विविध समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतानाच, त्या सोडवण्यासाठी तात्काळ संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसेच आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्कसोबत शहरातील सर्व प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला होता आणि निधी उपलब्ध होईल, तशी टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार होती ; मात्र त्यापूर्वीचे नियतीने त्यांना हिरावून नेले. आण्णांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव सक्रीय झाल्या आहेत. त्यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशिल आहेतच, तरीही आपणास गाफील राहून चालणार नाही. निवडणूक लागलीच तर जयश्री जाधव यांना खंबीरपणे साथ देणे आपले कर्तव्य आहे.
या विकासकामाचे उद्घाटन करताना आण्णांची उणिव प्रकर्षाने जाणवत आहे. आज आण्णां नाहीत, मात्र त्यांनी कोल्हापूरच्या विकासाचे एक स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आज पर्यंत जशी आण्णांना साथ दिलात, तसेच पाठबळ मलाही द्यावे अशी अपेक्षा श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.राजीव पारीख, सचिन मालू, सतीश माने, नितीन माने, कर्नल तावडे, रोहित शहा, राजेंद्र लकडे, रवी तिगणमणी, शुभदा कामत, शिवा, तसदी वहिनी, शोभा घोडके, विश्वास मोरे, अजित आजरी, यशोदा आजरी, शारदा नाखील, अॅड. किरण महाजन, सत्यजित कापडे, रसूल नदाफ राजन सातपुते, भागोजी गावडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, दिपक चोरगे, राजेश बाणदार आदी उपस्थित होते.
Leave a Reply