
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख ८० हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला.कोल्हापूर येथे भाजपा जिल्हा कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्यवस्था करण्यात आली होती याठिकाणी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राउत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी-मोर्चे यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी हा संवाद एकत्रित ऐकला.
आजच्या संवादामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव मोदीजींनी नेते समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगाव पोहोचवतील.
यानंतर बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी सुरु असणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आपल्या प्रभागातील जास्तीत-जास्त नागरिकांना करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे त्याचबरोबर कालच जाहीर झालेली प्रभाग रचना समजून घेऊन महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहन केले. येणारी उत्तर विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी जीवाचे रान करून जोमाने काम करुया असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मारुती भागोजी, चंद्रकांत घाडगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय अग्रवाल, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, डॉ.राजवर्धन, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, भरत काळे, अभी शिंदे, ओंकार खराडे, संजय जासूद, नरेंद्र पाटील यांच्यासह भाजपा प्रमुख दाधिकार्यांची उपस्थिती होते.
Leave a Reply