
कोल्हापूर: जयप्रभा स्टुडिओमधील जागेच्या खरेदीबाबत माझा कोणताही संबंध नाही. आम्ही त्यात पैसे लावले नसून प्रत्येक कोल्हापूरच्या आंदोलनांमध्ये माझा नेहमीच पुढाकार असतो. उत्तर विधानसभा पोटनिवडणूक जवळ आल्यामुळे काही राजकीय लोकांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचले आहे. वर्तमानपत्रातून माझी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. मागे एकदा मेडिकल बिल यांच्याबाबतीत असेच वर्तमानपत्रातून माझ्या विरोधात छापून आले होते. पण त्यात कोणतेही तथ्य नव्हते हे सिद्ध झाले. आताही तसेच आहे. कोल्हापुरातील कोणत्याही आंदोलनात मी सक्रिय सहभागी असून येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर माझी प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि काही लोक राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असेही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Leave a Reply