
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक समृद्ध ठिकाणे असून, सह्याद्री डोंगररांगा, नद्या, अभयारण्य, ऐतिहासिक तलाव, धरणे येथील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन घडवितात. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री अंबाबाई मंदिर, महत्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात. पर्यटन वृद्धीतून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी पर्यटन विभागाकडून मंजूर निधीबद्दल करवीरवासीयांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, श्री अंबाबाईची मूर्ती, पुष्पहार व शाल देवून नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मा.आम.चंद्रदीप नरके, मा.आम.सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, इंद्रजीत आडगुळे, अभिषेक देवणे आदी शिवसेना, युवा सेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply