‘झटका’ ४ मार्चला होणार प्रदर्शित

 

कोल्हापूर : सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेण्ड सुरू असताना प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर ४ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मर्डर मिस्ट्रीमुळे लागलेले ग्रहण पाहायचे असेल तर तुम्हाला ‘झटका, आता सुरुवात गोंधळाची’ हा चित्रपट नक्कीच पाहावा लागेल.उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘झटका’ या चित्रपटात झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ फेम पूर्णिमा डे आणि नवोदित अभिनेता गौरव उपासानी तुम्हाला पोट धरून हसवून घाबरवणार आहेत. पहिल्यावहिल्या रोमान्सची स्वप्न रंगवत नवा फ्लॅट भाड्याने घेत ही जोडी आपल्या प्रेमाला बहर देणार तेवढ्यातच एका बंद कपाटात त्यांना एक मृतदेह सापडतो आणि सुरू होतो पोलिसांचा ससेमिरा. यातून दोघे कशी सुटतात, खुनाची चौकशी अंगावर आल्यावर एकमेकांवर ढकलपंची करताना दोघांमध्ये होणारा विनोद, ‘तो’ मृतदेह कोणाचा असतो, मृतदेहाचा आणि नायक-नायिकेचा काय संबंध असतो, या सर्व गोष्टींचा उलगडा होत असताना अनेक विनोदी दृश्येही आपल्याला हसवतात.

चित्रपटाची निर्मिती डॉ पार्थसारथी, प्रेरणा उपासानी यांनी केली आहे. दिग्दर्शक अजिंक्य उपासानी झटका आता सुरुवात गोंधळाची चित्रपटाचे सिनेमेटोग्राफरही आहेत. यासह गौरव आणि अजिंक्य उपासानी या बंधूनी या चित्रपटाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे. या सर्व खुनाच्या झटक्यात खरा खुनी कोण आहे? हे पाहायला ४ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहाला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!