
कागल :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरु आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी राज्यात उच्चांकी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.कागलमध्ये मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीम व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते.भाषणात श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, दर तीन वर्षाने कोणत्याही राजकीय पक्षाची सभासद नोंदणी होत असते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही मोहीम सुरू आहे. व्यक्तीपेक्षा पक्षीय संघटनेला महत्त्व आहे. म्हणूनच उच्चांकी अशी नोंदणी करा. या उच्चांकी नोंदणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिकावर फडकवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कोल्हापूर बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे आदी प्रमुख उपस्थित होते.तसेच विकास पाटील, संजय चितारी, रणजित सुर्यवंशी, मनीषा पाटील, रिना घोरपडे, निलेश शिंदे, राहुल पाटील, बाबासाहेब सांगले, रणजित पोवार, विशाल कुंभार, प्रवीणकुमार कांबळे, डॉ इंद्रजित पाटील, सुरेश शेळके, मदन पलंगे, गिरीश कुलकर्णी,राजेंद्र पाटील, संदीप जाधव, इकबाल नाईकवडी, राजेंद्र माने, संदीप तोडकर, नेताजी मोरे, सतीश घाडगे, हणमंत मेंडके, सुरेश शिंदे, शंकर संकपाळ, चंद्रकांत कांबळे, दिगंबर परीट, अझरुद्दीन बालेखान आदी सेलचे अध्यक्ष हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
Leave a Reply