
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युवराज संभाजी छत्रपती महाराजांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार त्यांच्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याच्या उज्ज्वल परंपरेनुसार या कठीण काळातही युवराज संभाजी महाराज मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासपुर्ण आणि संयमाने परिस्थितीला सामोरे गेले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्टअसल्याने समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सात प्रमुख मागण्यांची आंमलबजावणी करण्यासाठी युवराज संभाजी छत्रपती महाराजांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार त्यांच्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याच्या उज्ज्वल परंपरेनुसार या कठीण काळातही युवराज संभाजी महाराज मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासपुर्ण आणि संयमाने परिस्थितीला सामोरे गेले. सरकारने उपोषणाची दखल घेऊन, समाजाच्या सातही मागण्या तत्काळ सोडवण्याचे लेखी पत्र दिले. हा समाजाच्या दृष्टीने मोठा विजय आहे. यामुळे समाजातील अनेक घटकांना मोठा लाभ मिळणार आहे.युवराज छत्रपती संभाजी महाराज उपोषणानंतर प्रथमच गुरूवारी कोल्हापूरात येत आहेत. त्यांचे स्वागत कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे. यातून छत्रपती घराण्या विषयी असणारी कृतज्ञता कोल्हापूर व्यक्त करणार आहेत.यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply