निवडणुक निकालांआधी खोट्या माहितीशी लढण्यासाठी कू अँप ने आणले मार्गदर्शक

 

गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये निवडणूक निकालांआधी कू अँप ने एक मार्गदर्शक आणले आहे. त्याचा हेतू यूजर्सना जबाबदारीने समाजमाध्यमांचा वापर करायला प्रवृत्त करण्यासह चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांना आळा घालण्यासंदर्भाने जागरूक करणे हा आहे. मार्गदर्शकाचा एक भाग म्हणून ‘कू’ अँप ने मंचावर असलेल्या सर्व 10 भाषांमध्ये आपली सामुदायिक मार्गदर्शक तत्वेही (Community Guidelines) समोर आणली आहेत. ही तत्वे भारतीय संदर्भांशी जोडलेली आहेत आणि क्रिएटर्ससह पहिल्यांदाच समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या युजर्सनाही अधिक चांगला कंटेंट बनवण्यासाठी के लिए सक्षम बनवतात. याशिवाय जबाबदार ऑनलाइन वर्तणुक काय असते हेसुद्धा त्यातून कळते. ही मार्गदर्शक तत्वे खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचा विशिष्ट संदर्भ देतात. यूजर्सना काहीही पोस्ट करण्याआधी माहितीची खातरजमा करण्याचे महत्त्व समजावतात. सोबतच पुरेशा पुराव्याविना कुठल्याही माहितीला ‘खोटी’ ठरवण्यापासूनही वाचवतात.

साधारणत: सोशल मीडियावर निवडणुक निकालांआधी चुकीच्या माहितीमध्ये वाढ झालेली पहायला मिळते. यासाठी कू अँप ने यूजर्सना माहितीची खातरजमा करण्याहेतूने प्रमुख थर्ड पार्टी फॅक्ट-चेकर्सपर्यंतही पोचवले आहे. समाजमाध्यम मध्यस्थाच्या नात्याने, कायद्याद्वारा आवश्यक नसेल तोवर ‘कू’ अँप स्वत: ना या माहितीच्या योग्य असल्याची खातरजमा करते ना कंटेटमध्ये हस्तक्षेप करते. याप्रकारे फॅक्ट-चेकर्सपर्यंतची पोहोच सक्षम बनवून ऑनलाइन सुरक्षा आणि पारदर्शिता निर्माण करण्यासंदर्भाने आपली कटिबद्धता ‘कू’ अधोरेखित करते.

तसे पाहता, खोट्या बातम्या बऱ्याचदा बॉट्स किंवा स्पॅम खात्यांद्वारे पसरवले जातात. यामुळेच ‘कू’ चुकीची माहितीला आळा घालण्यासाठी के लिए अशा खात्यांच्या कारवायांवर प्रभावीपणे नजर ठेवत त्यांच्यावर प्रतिबंध घातला जातो. 1 डिसेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत स्वत:ची ओळख वृत्तवाहिनी अथवा पत्रकार अशी करून देणारी 4270 पेक्षा जास्त खाती ‘कू’ने शोधली. त्यातील 834 स्पॅम किंवा अयोग्य सामुग्री बाळगताना आढळलेल्या हॅंडल्सवर निर्बंध घातले गेले. या हॅंडल्सवर ‘कू’ पुढेही नजर ठेऊन असणार आहे.

‘कू’ अँप चे सीईओ आणि सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “मातृभाषांमध्ये आत्म-अभिव्यक्तीसाठी एका सोशल मंचाच्या रुपात आम्ही क्रिएटर्सचे स्वागत करतो. यातून यूजर्सची रचनात्मकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळते आणि ऑनलाइन जगात अधिक व्यापक दृष्टिकोण अवलंबण्यासाठीही मातृभाषा सक्षम बनवतात. महत्वाच्या घटनांआधी चुकीची माहिती हा मोठाच चिंतेचा विषय आहे. या मार्गदर्शकाच्या माध्यमातून कू अँप एका जबाबदार मंचाच्या रुपात खोट्या बातम्या आणि द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करू शकते. सोबतच अधिक ऑनलाइन सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देऊ शकते. ही मार्गदर्शिका यूजर्स, विशेषत: पहिल्यांदाच समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या यूजर्सना सकारात्मक व आदरपूर्वक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्यास बळ देईल. यातून जास्त अर्थपूर्ण ऑनलाइन संवादाची निर्मिती होऊ शकेल. ‘कू’ यूजर्सना एक सुरक्षित आणि व्यापक अनुभव देण्यासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग निवडण्याचे प्रयत्न करतो.”निवडणुकांदरम्यान समाजमाध्यमांच्या नैतिक वापरासाठी इंटरनेट ॲन्ड मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे स्वैच्छिक आचारसंहितेवर स्वाक्षरी करणाऱ्याच्या रुपात कू अॅप निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास अधिक वाढवण्यासाठी मतदार साक्षरतेलाही प्रोत्साहन देते आहे. भारतीय संविधानानुसार पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांबाबत सशक्त बनवण्यासाठी मंचाने ‘कू वोटर्स गाइड’ आणले आहे. हे गाइड निवडणुकीआधी अनेक भाषांमध्ये सादर केले गेले. सोबतच मतदार जागृती अभियान जसे की, ‘प्लेज टू वोट’, ‘यूपी का घोषणापत्र’ यांना यशस्वीपणे पूर्ण केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!