
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागल-गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघात विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावातील शाळा व शाळांच्या परिसराची स्वच्छता केली. तसेच प्राथमिक शाळांना साहित्य, वस्तू भेटी दिल्या आहेत. रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा, वृक्षारोपण, गरजूंना वस्तू वाटप, आरोग्य शिबिर, लसीकरण असे अनेक उपक्रम जिल्ह्यातील विविध गावांतून राबविण्यात आले.
कागल येथे श्रीराम मंदिरात रामनवमी सोहळ्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी महाआरती केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांना दीर्घायुष लाभो ही प्रार्थना करण्यात आली. कागल नगर परिषदेच्या सर्व शाळांना अँड्राइड टीव्ही, शैक्षणिक सॉफ्टवेअर, प्रिंटर या वस्तू या ठिकाणी प्रदान करण्यात आल्या. यावेळी युवराज पाटील, भय्या माने, नवीद मुश्रीफ, चंद्रकांत गवळी, नवल बोते, प्रवीण काळबर, अजित कांबळे, सुनील माली संजय चितारी सौरभ पाटील
कागलमधील श्रीराम मंदिर येथे मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी नगरपालिका शाळांना स्मार्ट टीव्ही व अन्य शैक्षणिक साहित्य प्रदान केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
शशिकांत नाईक, अमित पिष्टे, किशोर सणगर, शहानूर पखाली, सुनील कदम आदी मान्यवर उपस्थित होते. गोसावी समाज येथे साखर वाटप करण्यात आले. तर, युवराज पाटील यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे खर्डेकर चौक उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. निराधार अनाथ त दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. रुग्णालयात फळवाटपही करण्यात आले.
समर्थ कन्स्ट्रक्शन व शहर राष्ट्रवादीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात २७२ जणांनी रक्तदान केले. यामध्ये २६ महिलांचा समावेश होता.
जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने म्हणाले, सर्व गावातील प्राथमिक शाळा व परिसराची स्वच्छता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ही संख्या पाहता ३००० तासांचे श्रमदान व ४० लाख रुपयांचे साहित्य शाळांना वाटप असे विधायक काम झाले आहे. तसेच
नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघास दळणवळणासाठी मोठे वहान प्रदान करण्यात आले.
यावेळी मा प्रताप ऊर्फ भैय्या माने,मा. युवराज पाटील मा. प्रकाश गाडेकर,मा. चंद्रकांत गवळी तालुका संघाचे अध्यक्ष जीवन शिंदे उपाध्यक्ष महेश चौगुले सर्व संचालक, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply