
कोल्हापूर / प्रतिनिधी:भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’च्या (जीतो) वतीने जगभरामध्ये १०८ देशांमध्ये व भारतामध्ये ६ हजार ठिकाणी नवकार महामंत्र जप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन-जितो अपेक्स’ या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी हा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमांमध्ये एक कोटी आठ लाख लोक सहभागी होणार आहेत. जगभरात बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी एकाच वेळी सकाळी
८ ते ९ या वेळेमध्ये नवकार महामंत्राचे पठण करण्यात येणार आहे. भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.
कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागातील दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी या सर्व पंथीय जैन बांधवांसाठी महासैनिक दरबार हॉल, सर्किट हाऊस रोड, बावडा येथे, तर जीतो इचलकरंजी चॅप्टरच्या वतीने नामदेव भवन ग्राऊंड, इचलकरंजी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Leave a Reply