
कोल्हापूर:राज्यात इनोवेशन आणि इंक्युबेशन इको सिस्टीम तयार करण्याचा मानस शासनाने जाहीर केला आहे.युवा पिढीला विशेष संधी म्हणून स्टार्ट अपसाठी बीज भांडवल तसेच इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विशेष सुविधा आणि मार्गदर्शन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. 100 कोटीचा स्टार्टअप फंड देण्याचा निर्णय हा स्टार्टअप ला पाठबळ देणारा आहे. या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच 3 हजार इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध करुन देणे, एनसीसी मधील प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा पोलीस दलात समावेश होण्यासाठी प्रयत्न यासारखे नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश केला आहे.
समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प
ना. सतेज पाटील
समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. त्याबरोबर राज्याचा सर्व भागातील महत्वाच्या विषयांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य सेवा, दळणवळण सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार देवून या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ दिले आहे. महालक्ष्मी मंदीर विकास आराखडा पुढील टप्यासाठी 25 कोटी. तसेच शिवाजी विद्यापीठ आधुनिकीकरणासाठी १० कोटी. शाहूमिल येथील राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे.
Leave a Reply