
कोल्हापूर/प्रतिनिधी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी शिर्के सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर ख्यातनाम वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित तर ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले.कुलगुरू शिर्के यांनी रशिया व युक्रेनमधील संघर्षाचा संदर्भ देताना तेथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भारतात परतत आहेत. या घटनेनंतर उर्वरित शिक्षणाचे काय? आणि वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना इतक्या लांब का जावे लागते हे दोन प्रश्न निर्माण झाले आहेत. याची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. सरकारला विशेष धोरण तयार करावे लागेल, त्यापेक्षाही मेडिकल व परामेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक संधींचा विस्तार करून यावर यावर शाश्वत उपाय काढता येऊ शकतो असे डॉ. डी. टी शिर्के यांनी सुचवले. कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांसह पदवी पदविका विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे कार्य करावे, आधुनिक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुद्गल यांनी विद्यापिठ्चाया प्रगतीचा वाढवा मांडत मिळालेले पुरस्कार, विद्यापीठाने गाठलेले माईलस्टोन यांची माहिती दिली. वेगवान जगात टिकायचे तर सतत शिकत राहा, नावे ज्ञान-कौशल्ये आत्मसात करा. समाजाला व जगाला आरोग्यसंपन्न बनविण्यात आपण सर्वजण निश्चितच महत्वपूर्ण योगदान द्याल याची खात्री आहे.सत्काराला उत्तर देताना, यादव म्हणाले, शाहू नागरी जागतिक पातळीवरील मेडिकल हब म्हणून पुढे येण्यास डी.वाय. पाटील विद्यापीठाचे योगदान महत्वाचे आहे. कोल्हापुरात सर्व प्रकारची फुले, वनस्पती आढळतात. वनस्पती आहेत म्हणून मानवी जीवन आहे. वनस्पतींनीच मला ओळख दिली. वनस्पतीविना मानवी जीवन व प्रगती अशक्य आहे. विद्यापीठ संवर्धन मोहीम राबवतेय, त्याला इतरांनी ही हातभार लावावा. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण. बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी शाहू महाराज यांनी केलेले कार्य आणि त्याचे परिणाम मी जवळून अनुभवले.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर ख्यातनाम वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित तर ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले.यावेळी, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply