गोकुळचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ गोकुळ चा ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी संघाच्‍या ताराबाई पार्क येथे चेअरमन विश्‍वास पाटील व संचालकसो यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपन करण्‍यात आले. व गोकुळ प्रकल्प येथे सत्‍यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते व मा. चेअरमनसो यांच्या हस्ते संचालक यांच्या उपस्थित केक कापण्‍यात आला.  तसेच संघाच्या विविध ठिकाणी असणा-या दूध शितकरण केंद्रावरही वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि गोकुळ दूध संघाची स्‍थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली आज ७०० लिटर वरुन प्रतिदिनी जवळपास १५ लाख लिटर दूध संकलन होत आहे. या सर्व गोकुळच्या जडणघडणे मध्ये स्व.आनंदराव पाटील-चुयेकर, व संघाचे आजी माजी चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी गोकुळचा कणा असलेले गोकुळचे लाखो दूध उत्‍पादक,दूध संस्था, ग्राहक, वितरक, संघ कर्मचारी व वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असून नुतून संचालक मंडळ व आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्‍ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील  त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्‍ठ साध्‍य करेल असा विश्‍वास संघाचे चेअरमन विश्वास पाटील याप्रसंगी  व्‍यक्‍त केला. गोकुळचे दूध उत्‍पादक,दूध संस्था, ग्राहक, वितरक , कर्मचारी,वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, रणजीतसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!