
कोल्हापूर :पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. “सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान” या विषयावर ही अभ्यासभेट होती. या अभ्यास भेटीत नेपाळ कृषी विकास बँकेसह दिल्लीस्थित नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, तामिळनाडू सहकारी मार्केटिंग संस्था, आंध्र प्रदेशातील तेलंगणा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक तसेच बेंगलोरमधील नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापनामधील अधिकारी सहभागी झाले. या अभ्यासभेटीत वैकुंठ मेहता संस्थेच्या ‘सहकार आणि उद्योग’ या विषयाच्या पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाच्या नेपाळसह दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथील २६ प्रशिक्षणार्थीचा समावेश होता.बँकेच्यावतीने संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रशिक्षणार्थी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी बँकेच्या कामकाजाविषयी विभागनिहाय सविस्तर माहिती दिली. तसेच सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात असलेल्या बँकेच्या योगदानाविषयी सविस्तर विवेचन केले.
Leave a Reply