मन झालं बाजींद मध्ये बगाड यात्रा विशेष

 

मालिकेचे इतिहासात पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत सातारा – वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवत आहोत . वाई येथील फुलेनगर – शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड आपण या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांन समोर आणत आहोत.कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा हा निर्णय रायाने घेतला आणि त्याच दरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली आहे रायाला समजते आणि तो ठरवतो की देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचे . पण ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो . या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात पण या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाड्याचा मान रायभान विधाते ला मिळतो . याच दरम्यान कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की येत्या 7 दिवसात तिचा मृत्यूयोग आहे त्यावर राया त्यांना सांगतो मी माझ्या कृष्णाचा मृत्यू टाळेल. आणि तो बगाड्या म्हणून उभा राहतो . रायाची भक्ती वाचवू शकते का कृष्णाचे प्राण हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!