
कोल्हापूर : धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो, असे प्रतिपादन प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले.मराठी महिन्यांमध्ये नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्या दृष्टीने करवीर पीठाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. त्या अनुषंगाने या वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.स्वामीजी म्हणाले, धर्म ही आचरण्याची गोष्ट आहे, तर अध्यात्म अनुभवण्याची गोष्ट आहे. धर्माला धरून कोणत्याही गोष्टीविषयी निर्णय घेतला जातो. तिथी कशी धरावी, यासारख्या बाबींकडेही दिनदर्शिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.या दिनदर्शिकेमध्ये तिथी, सण, वारांची तर माहिती आहेच शिवाय या वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये सण, उत्सावासंबंधी प्रत्येक महिन्यानुसार पीठाकडून मार्गदर्शनही केले आहे.सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी स्वागत करून दिनदर्शिकेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी महेंद्र इनामदार, बाबासाहेब खाडे, दिलीप यादव, विक्रम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Leave a Reply