
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दिंनाक ०१/०४/२०२२ पासुन दरवाढ करणेत येत आहे. म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर ४१.५० पैसे वरून ४३.५० पैसे इतका होणार आहे. तसेच गाय दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करणेत आली आहे. त्यामुळे गाय दूध दर २७.०० रूपये वरून २९.०० रूपये इतकी दर वाढ करण्याचा निर्णय ३०/०३/२०२२ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये घेण्यात आला आहे अशी माहिती श्री पाटील यांनी दिली.पुढे बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि गोकुळ दूध संघाने गुडी पाडव्या पुर्वी दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी दर वाढ केली आहे. तसेच गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे असे मनोगत व्यक्त केले व गोकुळचे दूध उत्पादक,दूध संस्था, ग्राहक,वितरक,कर्मचारी,वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने गुडी पाडव्या च्या शुभेच्छा दिल्या.तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.
संचालक मंडळाच्या बोर्ड मिटींगला संघाचे चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अभिजित तायशेटे ,अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, रणजीतसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply