शाहू छ महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन  

 

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रिडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी ६ मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यानिमित्त, महाराजांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी दिलेले अमूल्य योगदान व या क्षेत्रात केलेले लोकोत्तर कार्य यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महाराजांनी कोल्हापूरात उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासबाग कुस्ती मैदानात ‘हिंदकेसरी’ सारख्या राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करावे, या मागणीसह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावर, हिंदकेसरी स्पर्धा ही न्यायालयीन कचाट्यात अडकली असल्याने तितकीच प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी संभाजीराजे यांना दिली. यामुळे, छत्रपती शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कुस्ती या खेळालाही त्याचा भरीव फायदा होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याविषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले श्री बृजभूषण हे स्वतः एक उत्तम मल्ल आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान हे त्यांना चांगलेच माहीत आहेत. मी महाराजांच्या विचार कार्याबद्दल त्यांना माहिती देत असताना ते भारावून गेले. महाराजांप्रती त्यांच्या मनी असणारा आदरभाव व कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!