
कोल्हापूरःकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्य संघाचे चेअरमन मा.विश्वास पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला .यावेळी डोंगळे साहेब सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, मी सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून दूध व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतक-यांची जास्तीत-जास्त सेवा करता यावी यासाठी गोकुळ दूध संघामार्फत मी नेहमीच प्रयत्नशील असतो असे मनोगत व्यक्त केले. माझा वाढदिवस साजरा केल्या बद्दल मी गोकुळ परिवारातील सर्व घटकाचा आभारी आहे.यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, व इतर संचालकांनीही आपली मनोगते व्यक्त करुन डोंगळे साहेबाना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गोकूळचे चेअरमन विश्वास पाटील,संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply