
कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनची २०२२- २३ या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.सर्व नियमांचे पालन करत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.गीता पिल्लाई, मानद सचिवपदी डॉ.ए. बी.पाटील आणि खजानिसपदी डॉ.शैलेश कोरे यांची निवड करण्यात आली.
मावळत्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांनी नूतन अध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई यांच्याकडे सूत्रे सोपविली. कोरोना काळात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. दुसरी लाट आली असतानाही कोल्हापुरात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. यापुढेही सर्व डॉक्टर्स रुग्णसेवेत कुठेही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही नूतन अध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई यांनी पदभार स्वीकारताना दिली.
इतर कार्यकारणी सदस्य: मावळत्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. किरण दोशी व डॉ.अमोल कोडोलीकर,सल्लागार समिती अध्यक्ष डॉ.संदीप साळोखे, सभासद डॉ.आबासाहेब शिर्के,डॉ.शितल देसाई,डॉ.राजेंद्र चिंचणीकर,डॉ. सोपान चौगुले,
डॉ.देवेंद्र जाधव,डॉ.साई प्रसाद,डॉ.नीता नरके,डॉ.सुरज पवार,डॉ. कौस्तुभ वाईकर,डॉ.गौरी साई प्रसाद,डॉ.अभिजित तगारे,डॉ. मेघना चौगुले,डॉ.अरुण धुमाळे, डॉ. प्रवीण नाईक,डॉ.अभिजित कोराणे, डॉ.संगीता निंबाळकर,डॉ.अमर अडके,डॉ.शीतल पाटील,डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.अशोक पाटील,डॉ.आशुतोष देशपांडे, डॉ.रमाकांत दगडे,डॉ. सलीम लाड,डॉ. अश्विनी पाटील, डॉ.सूर्यकांत मस्कर
Leave a Reply