सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने मोफत अन्नछत्राचे जोतिबा डोंगरावर आयोजन

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेली 19 वर्षे सातत्याने भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. परंतु मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे व निर्बंधांमुळे जोतिबाची यात्रा होऊ शकली नाही. परंतु यावर्षी ही यात्रा 16 एप्रिल रोजी भरत आहे. या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांचा उत्साह अमाप आहे. म्हणूनच गायमुखावर 14 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान चोवीस तास अन्नछत्राचा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती चिंतन शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दोन वर्षे कोरोना संकटामुळे यात्रा न झाल्यामुळे यावर्षी दुप्पट लोक जोतिबा दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या सर्वांना तीन दिवस दिवस रात्र अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेदेखील संमती त्यांनी सांगितले. शासनाच्या सर्व परवानग्या यासाठी मिळाल्या असून चारशे लोक हे या अन्नछत्रासाठी सेवा देणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. या अन्नछत्रासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. यासाठी ज्यांना देणगी द्यायची असेल ते देखील देऊ शकतात असे देखील चिंतन शहा यांनी सांगितले. यावेळी मनिष पटेल, संकेत पाटील चेतन परमार, रोहित गायकवाड, प्रमोद पाटील, प्रकाश केसरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!