
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी बहुमताने विजय मिळवून, कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला. त्यांच्या विजयात शिवसेनेने मोलाचा वाटा उचलला आहे. एकीकडे भाजपकडून शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाने शिवसैनिकांना केलेले आवाहन आदीबघता शिवसेनेची मते न फुटू देता महाविकास आघाडीलाच मतदान होईल, हे शिवधनुष्य लीलया पेलणाऱ्या आणि विजयात किंगमेकरची भूमिका बजाविणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गारही यावेळी काढले. महाविकास आघाडीच्या नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्यासमवेत महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी यांनी राजेश क्षीरसागर यांचे विशेष कौतुक केले. यासह नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पालकमंत्री ना.सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.
Leave a Reply