
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन ऑफ कोल्हापूर या संघटनेच्यावतीने तज्ञ डॉ. राहुल पंडित यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. साईप्रसाद, सचिव डॉ. सागर कुरुंदकर, खजानिस डॉ. प्रताप वरुटे व सल्लागार समिती सदस्य डॉ. प्रल्हाद केळवकर यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात तसेच कोरोना काळातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाचा काळ अतिशय कठीण होता. आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हानात्मक होता. या काळात हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणारे, तळागाळापर्यंत कोरोनाचे उपचार पोहोचवणारे, रुग्णांसाठी सतत रुग्ण सेवा देणारे, कोरोनात गंभीर प्रकृती असणाऱ्या अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढणारे डॉक्टर म्हणून डॉ. राहुल पंडित यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केले आहे. म्हणून कोल्हापूरच्या क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटीच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
Leave a Reply