गोकुळची एका  दिवसाची २० लाख ०२  हजार  लिटर्स दूध विक्री

 

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने निर्भेळ आरोग्‍यदायी मलईदार, आणि अस्‍सल चवीच्या उत्पदनाने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला असून गोकुळच्या दुग्धजन्य पदार्था बरोबरच शुध्‍द व सकस दुधाला‍ हि ग्राहकांनी पसंती दिली आहे. गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्‍या दूध विक्रीचा नविन उच्‍चांक प्रस्‍तापीत करतांना आज रमजाण र्इद व अक्षय्या तृतीयेच्‍या दिवशी गोकुळच्‍या इतिहासातील उच्‍चांकी अशी २०लाख०२हजार०२१लिटर्स इतकी दूध विक्री एका दिवसात झालेली आहे.गतवर्षी  याच दिवशी १६ लाख ३८ हजार १८०लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एका  दिवसात केलेली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ ३ लाख ६३ हजार ८४१ लिटर्स ने वाढ झालेली आहे.अशी माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली व पुढे बोलताना म्हणाले कि या विक्री मध्ये दूध उत्पादक , दूध संस्‍था, ग्राहक, कर्मचारी, वितरक वाहतुक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे आहे असे मनोगत व्‍यक्‍त केले.  गोकुळ परिवाराच्या वतीने अक्षय्या तृतीयेच्या व  ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!