
कोल्हापूर – कोरोनाच्या तब्बल दोनवर्षाच्या संक्रमण काळातून अवघे जग आता सावरत आहे.अशातच दोन वर्षे सौदी अरेबिया मधील सरकार ने बंद केलेली हज यात्रा यंदा मात्र वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्यासाठी काही नियमांच्या अधीन राहून खुली केली आहे.नुकताच हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने लॉटरी पद्धतीने हज यात्रेकरूंची 2022 च्या यात्रेसाठी निवड करण्यात आली असून त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 108 हज यात्रेकरु निवडले गेले आहेत.या यात्रेकरूंना हज फाउंडेशन,कोल्हापूर च्या वतीने गुरुवार दि.12 पासून सलग तीन दिवस हज यात्रेदरम्यान होणाऱ्या विधींच्या बाबतीत प्रशिक्षण दारुल उलूम मदरसा शिरोली येथे दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण स्व.हाजी सिकंदर मणेर यांनी सुरू केले, जवळजवळ 35 वर्षे सिकंदर मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली हज यात्रेकरूंना विमान प्रवास करण्यापासून हज विधी पर्यंतचे प्रशिक्षण दिले जात होते.त्यांच्या निधनानंतर हज फाउंडेशन कोल्हापूर च्या वतीने हाजी सिकंदर मणेर यांचे हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहणार आहे.यंदाचे हे प्रशिक्षण कोल्हापूर जिल्ह्याचे मर्कजचे प्रमुख (आमिर साहब) हाजी दिलावर मुलाणी (बालिंगे) यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य तज्ज्ञांच्या सहकार्याने दिले जाणार आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील यंदा हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी हज प्रशिक्षणासाठी दि.12 ते 14 मे पर्यंत सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन हज फौंडेशनचे उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार ,सचिव समीर मुजावर, खजानिस हाजी बाबासाहेब शेख ,हाजी इम्तियाज बारगिर,हाजी अस्लम मोमीन यांनी केले आहे.
Leave a Reply