कोल्हापूर भुलतज्ञ संघटनेतर्फे आयोजित ‘वॉकेथँलॉन’ जीवन संजीवनी जनजागृती उपक्रम

 

कोल्हापूर: महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेशी संलग्न संघटना कोल्हापूर भुलतज्ञ संघटनेतर्फे आयोजित ‘वॉकेथँलॉन’ हा जीवन संजीवनी जनजागृती उपक्रम रंकाळा चौपाटी येथे नुकताच घेण्यात आला.या कार्यक्रमचा शुभारंभ संस्थेच्या नूतन अध्यक्षा डॉ.रश्मी चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. शिवाजी जाधव व मानद खजिनदार डॉ.विठ्ठल पाटील यांच्या हस्ते रंकाळा चौपाटीवर ‘आम्ही कोल्हापुरी’ या सेल्फी पॉईंट जवळ झाला.
यावेळी एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद झाल्यावर ते कसे ओळखावे व COLS हे प्राथमिक उपचार कसे द्यावेत.यासंदर्भात सकाळी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या पादच्याऱ्यानी याचा लाभ घेतला.साकच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या उपचार पद्धतीची सध्या संपूर्ण भारतात जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
यावेळी संस्थेचे पंचवीसहुन अधिक डॉक्टर सदस्य हजर होते. यामध्ये प्रामुख्याने केएमए चे माजी अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के,महाराष्ट्र कौन्सिल सदस्य डॉ.शीतल देसाई, डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे भूल शास्त्रविभाग प्रमुख डॉ.संदिप कदम,सीपीआरचे डॉ.प्रदीप राऊत भूलतज्ञ डॉ.भरत ठकार, डॉ.विजय चव्हाण, डॉ.हेमा आलासे, डॉ. शशिकांत सांगावकर,डॉ.पल्लवी कुलकर्णी,डॉ. राजाराम पाटील, डॉ. अर्चिता पाटील,डॉ.किरण भिंगारडे,डॉ. आरती जाधव, डॉ.सचिन कुंभार, डॉ. सुप्रिया कुलकर्णी, डॉ शुभांगी पवार उपस्थित होत्या.
कोल्हापूर भुलतज्ञ संघटनेतर्फे सुद्धा यात पुढाकार घेतला आहे. कोणाला याविषयीं प्रात्यक्षिक व माहिती पाहिजे असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अपवर संपर्क साधावा,असे आवाहन यावेळी केले.
M-9850842738

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!