
कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत तर मोठमोठ्या इमारती,मोबाईल टॉवर यामुळे पक्षांच्या वावरण्यावर गदा येत आहेत.काही तर बघायलाही मिळत नाहीत अशा या प्राण्यांना व पक्षांना एकत्र पाहण्याची व त्यांचा आवाज एकण्याची संधी आता कोल्हापूरकरांना मिळत आहे.येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदान येथे महाराष्ट्रातील प्रथमच डीजे अँम्युझमेंट पार्क,रोबोटीक बर्डस शो असणारी अँनिमल नगरी उभी करण्यात आली आहे.ज्याद्वारे प्राणांसोबत,पक्षांसोबत व खेळाच्या विविध साधनांमधून धमाल मस्ती करायला मिळत आहे. आता ही नगरी काही कालावधी साठीच याठिकाणी असणार आहे तरी कोल्हापूरकरांनी याठिकाणी भेट देऊन या नगरीत धमाल मस्तीचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक जयराज व कपिल मलिक यांनी केले आहे.
या नगरीमध्ये कोल्हापूरकरांना निर्जीव प्राण्यांमध्ये व पक्षांमध्ये जिवंतपणा असल्याचे पहावयास मिळत आहे.”सेल्फी आर्ट गॅलरी” शिवाय स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थ खाण्याची संधी याठिकाणी मिळत आहे. खेळाच्या माध्यमातून धमाल मस्ती करता येत आहे. शिवाय याठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या जंगलात वेगवेगळे प्राणी जसे हत्ती, हरण आदिवासी लोक पहावयास मिळत आहेत. तर पक्षांमध्ये पोपट,घुबड, कोकिळा,शहामृग,राजा गिधाड,सुतार पक्षी,क्रेन, ब्ल्यू विनिद कुकबुरा,डायनसोर पक्षी,चमच्या सारखा तोंडाचा पक्षी,कबुतर,उत्तरेकडील उडू न शकणारा पक्षी,हत्तीसारखा पक्षी,ऑस्ट्रेलियन पोपट,तितर पक्षींण, पेंग्विन आदी पहावयास मिळत आहेत. शिवाय प्राण्यांमधील व पक्षांमधील जिवंतपणा ही पहावयास मिळणार आहे. सेल्फी आर्ट गॅलरी मधून प्रत्यक्ष स्वतःचा फोटो काढता येत आहे. यामध्ये याठिकाणी मदर तेरेसा,मोनालीसा,वाघ,छत्री,चार्ली चॅपलीन अशा बऱ्याच चित्रांचा समावेश आहे. याचबरोबर याठिकाणी खेळणी महिलाना लागणारे साहित्य किचन साहित्य आदीचीही खरेदी करता येत आहे. विक्रीसाठी २५ स्टॉल मांडण्यात आले आहेत. या मनोरंजन नगरीत खेळण्यांमध्ये मोठ्यासाठी जॉईंट व्हील,ब्रेक डान्स,कोलंबस,ड्रॅगन ट्रेन,टोरा टोरा,आकाश पाळणा व लहान मुलांसाठी मोटरसायकल, ड्रॅगन ट्रेन, क्लास वेल पाळणे पाण्यातील कोलंबस,मिकी माउस असे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व नगरीमध्ये शंभर जणांची टीम कार्यरत असून आता केवळ काही दिवसच याठिकाणी मनसोक्त धमाल-मस्ती कोल्हापूरकरांना करता येणार आहे.ही नगरी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.तरी कोल्हापूरकरांनी याठिकाणी भेट द्यावी असे आवाहन संयोजक जयराज, राजू अनिगिरी,लोकेश सीए,सादिक नाईक,गणेश इंगवले आदींनी केले आहे.
Leave a Reply