
कोल्हापूर: खरं तर कॅन्सरचे निदान आपली विविध पातळीवर कडक परीक्षा पाहत असते. कॅन्सर पीडित आणि त्याचे कुटुंब यांची होणारी घालमेल त्रास, मग आपलेपणाची आणि आधुनिक उपचारांची फुंकर, दिलेला मानसिक आधार आणि कॅन्सरचे मळभ दूर करून आत्मविश्वासाने परतणाऱ्या ‘त्याला’ आम्ही पाहात आलोय; डोळ्यात साठवतोय…गेली दहा वर्षे.आज त्यांनी दाखवलेल्या जिद्दीचा, त्यांनी कॅन्सरविरुद्ध दिलेल्या लढ्याचा आज कौतुक सोहळा होता. आज २१ मे २०२२ रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या आवारात ठरलेल्या वेळी आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. श्रीमती शांताबाई भास्कर पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी त्याचप्रमाणे कॅन्सर सर्व्हायव्हर्सनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम झाला. यावेळी काही डॉक्टर्स, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे कर्मचारी तसेच काही पेशंट्सनी आपल्यातील कला दाखवली.
Leave a Reply