डॉ.अथर्व गोंधळीची मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ अथर्व संदीप गोंधळी याने ३० जानेवारी २०२२ रोजी नऊ तासाची बर्गमन ११३ ही ट्रायथलॉन स्पर्धा ६ तास ३४ मिनिटे ५१ सेकंदात पूर्ण केली आणि तो यंगेस्ट बर्गमन ठरला होता त्याची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती या विश्वविक्रमाची नोंद आता मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नेही घेतली आहे.डॉ. अथर्व ने १.९ किलोमीटर स्विमिंग ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग ही ९ तासाची स्पर्धा सहा तास ३४ मिनिटे ५१ सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.याचे प्रशस्तीपत्र,ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह डॉ.अथर्व यास माननीय जिल्हाधिकारी श्री .राहुल रेखावार यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी डॉ.अथर्वने केलेल्या या विक्रमांची माहिती घेतली व त्याच्या या धाडसाचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अथर्वने त्याने केलेल्या या स्पर्धांची माहिती जिल्हाधिकारी यांना सांगितली.

आतापर्यंत अथर्वने सायकलिंग मध्ये १० विश्वविक्रम केले आहेत.
तायक्वांदो मध्ये अकराव्या वर्षी तो ब्लॅक बेल्ट झाला आहे .अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय प्रादेशिक पुरस्कार त्याने मिळवले आहेत.
यावेळी सहाय्यक आयुक्त श्री संजय माळी डॉ.मनिषा गोंधळी, डॉ. संदीप गोंधळी, श्रद्धा जोगळेकर आदी उपस्थित होते. यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू ,कपिल कोळी, क्रीडाशिक्षक विक्रमसिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके आई डॉ.मनिषा गोंधळी, वडील डॉ.संदीप गोंधळी यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!