नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत

 

नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत

कोल्हापूर/प्रतिनिधी:नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.राज्यसभेच्या निवडणूकीत विजय मिळवलेले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन झाले. सायंकाळी ४ वाजता ताराराणी चौकात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आली. धनंजय महाडिक यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते कावळा नाका इथल्या कार्यालयात शुभेच्छा स्विकारल्या. त्यासाठी जिल्हयातील महाडिक प्रेमी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्ते ताराराणी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यसभेच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत बाजी मारत धनंजय महाडिक विजयी झाले. त्यानंतर ते कोल्हापुरात आले आहेत. शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक व्हीनस कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक,दसरा चौकातील राजर्षि शाहूंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर खासदार महाडिक श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हयातील महाडिक प्रेमी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!