
करंजिवणे:मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. मात्र; मंत्पदाची हवा कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे., असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहीन, असेही ते म्हणाले.करंजीवने ता. कागल येथे विवीध विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एस. पवार होते.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे ग्रामीण विकासासाठी निधी देण्याचे काम माझ्याकडे आहे. मी ग्रामविकास मंत्री असल्याने प्राथमिक शाळा दुरूस्तीसाठी, क्रीडा संकुलनासाठी कोट्यावधी रुपयेचा निधि मंजुर करणार असून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी निधिसाठी पाठपुरावा करावा. विरोधकावर टीका टीपणी करण्यापेक्षा व केलेल्या टीकेला उत्तर न देता फक्त विकासकामाचे ध्येय गाठणार आहे. विधवासंबंधातील सर्वच जुनाट कुप्रथा मोडीत काढा. तसेच; प्रत्येक गावात विधवा माता-भगिनींचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत म्हणाले, माणसातला खरा देव म्हणजे ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ होय.उत्तम टेंबुगडे, शशिकांत खोत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत युवराज लाड यानी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य संजय आंग्रे यांनी केले. आभार एम. एस. पोवार यांनी मानले.
Leave a Reply